Homeसांस्कृतिकगौरीशंकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तारदाळ यांच्या वतीने राजधानी रायगड किल्ल्याची भव्य...

गौरीशंकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तारदाळ यांच्या वतीने राजधानी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन संपन्न

छत्रपती संभाजी महाराज चौक, लोटस कमान, गौरीशंकर नगर, तारदाळ येथे गौरीशंकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तारदाळ यांच्या वतीने राजधानी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून तिचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब व गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते, गणेशभक्त आणि उत्सवप्रेमी उपस्थित होते. रायगड किल्ल्याची ही भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमादरम्यान गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनीही तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा मार्ग दाखवणारे विचार मांडले.

आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी आयोजक मंडळाचे अभिनंदन करताना सांगितले की, “रायगड किल्ल्याची ही प्रतिकृती केवळ कलाकौशल्याचे दर्शन घडवते असे नाही, तर आपल्या इतिहासाची आणि शिवसंस्कृतीची जाणीवही ताजी करते.”

या भव्य कार्यक्रमास अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व गणेशभक्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular