Homeमनोरंजनदिवाळी पाडव्यानिमित्त स्वरांची उधळण.

दिवाळी पाडव्यानिमित्त स्वरांची उधळण.

प्रतिवर्षाप्रमाणे स्वरतरंग संगीत अकॅडमी भोनेमाळ इचलकरंजी यांच्यावतीने सलग सातव्या वर्षी लोक आग्रहास्तव स्वर तरंगच्या यशवंत व गुणवंत कलाकारांचा सहभाग बुधवार दिनांक 22 /10 / 2025 रोजी सायंकाळी 4:00वाजता प्रियदर्शनी कॉलनी सर्वोदय विद्यालयाजवळ महानगरपालिका हॉलमध्ये भावगीत भक्तीगीत स्वरतरंग संगीत अकॅडमी प्रस्तुत ” क्षण दिवाळीचे सूर आनंदाचे “हा सुमधुर गीतांचा मराठी भावगीत भक्तीगीत व हिंदी गीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत साजरा केला जात आहे.याची तयारी पूर्ण झाली असून हा 1481 वा कार्यक्रम रसिकांसाठी सादर केला जात आहे. रसिकांनी पारंपारिक वेशात येण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्रीपती कोरे सर यांनी केले असून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

उत्तम साऊंड सिस्टिम, एलईडी वॉल, बैठक व्यवस्था, स्वरतरंग संगीत अकॅडमीची असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नृत्यांगना सौ रावळ मॅडम भूषवणार आहेत. अनेक पुरस्काराने रावळ मॅडम सन्मानित आहेत. त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. रमेश नायकवडी सर,श्री नामदेव चौगुले सर,युवा नेते आशिष खंडेलवाल साहेब, सत्यमुख चे संपादक माननीय श्री रमेश भाई पंडयांजी व ग्रामदेवतांचे संपादक माननीय श्री सखाराम जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पंचक्रोशीतील संगीत रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील संगीत रसिकांसाठी ही संगीत पर्वणीस ठरेल असे कोरे सर यांनी आपले मत व्यक्त केले.यावेळी संचालक पदाधिकारी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 22 /10 / 2025 सायंकाळी 4:00वाजता प्रियदर्शनी कॉलनी सर्वोदय विद्यालयाजवळ इचलकरंजी येथे महानगरपालिका हॉलमध्ये होत असून याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीपती कोरे सर यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular