Homeराजकीयसमाजात सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेच्या भावनेचा उजेड पेरणारा उत्सव म्हणून दीपोत्सव साजरा करा...

समाजात सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेच्या भावनेचा उजेड पेरणारा उत्सव म्हणून दीपोत्सव साजरा करा ~ केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या दिपावली निमित्त शुभेच्छा


दीपावली हा उत्सव संपूर्ण देशात आनंद उत्साह बंधुभाव निर्माण करणारा उत्सव आहे.उजेडाचा हा उत्सव अज्ञान रुपी अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशाचा दीपोत्सव आहे.सर्व जाती धर्माचे लोक दीपावली चा उत्सव साजरा करताना संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभावातील बंधुतेची भावना प्रबळ करणारा ;समाजात बंधुतेचा उजेड पेरणारा दीपावली चा उत्सव आहे.संपूर्ण देशात मनामनात बंधुतेचा उजेड पेरणारा उत्सव दीपोत्सव ठरावा असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवाळीच्या मंगलपर्वाच्या सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपावली उत्सवानिमित स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचा निर्धार आपण केला पाहिजे. प्रदूषण वाढविणाऱ्या फटाक्यांऐवजी पर्यावरण जपण्याचा विचार आपण केला पाहिजे. दिपावली निमित्त सर्व देशात सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांना दीपावली च्या शुभेच्छा देतात हा मनस्वी आनंद देणारा भाईचारा आहे. सर्वधर्मसमभावाचा विचार वृद्धिंगत करणाऱ्या दीपावलीच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा.ही दीपावली सर्वांना सुख समाधान आरोग्य देणारी ठरो अशा दीपावली निमित्ताने न. रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular