इचलकरंजी/प्रतिनिधी –
महाराष्ट्र आणि कर्नाटकात विस्तार असलेल्या येथील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिपावली पाडव्या दिवशी 8 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. बँकेच्या वतीने विशेष ठेव जमा योजना सुरु करण्यात आल्या असून आर्थिकदृष्ट्या शुभ मानल्या जाणार्या दिपावली पाडव्याला नवीन खातेदार, ठेवीदार व विविध ठेव योजनांत खातेदारांनी बचतीची गुंतवणुक बँक ठेवी करून देशाच्या आर्थिक प्रवाहात सहभाग नोंदवला असल्याचे चेअरमन सुनिल पाटील यांनी सांगीतले.
सन्मती बँकेने दिपावली पाडवा दिवशी ठेवी स्विकारण्यासाठी बँकेच्या प्रधान कार्यालयासह सर्व 12 शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेने सुरू केलेल्या सन्मती अक्षय ठेव योजना, सन्मती बॉण्ड ठेव योजना, मुदतबंद ठेव योजना, पुर्नगुंतवणुक योजना, रिकरींग ठेव योजना, मासिक ठेव योजना आदी सर्वच ठेव योजनांना ग्राहकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. बँकिंग क्षेत्रातील स्थैर्य वाढवणे, बचत संस्कृती प्रोत्साहीत करणे, खातेदारांना आकर्षक व्याजदर देण्याचे माध्यमातून गुंतवणुकीकडे वळवणे हा हेतू सफल झाला आहे. बँकिंग व्यवसायातील विश्वासाचे द्योतक आहे.
चालू वर्षाअखेर बँकेचे 400 कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. बँकेने ग्राहकांना सुलभ व्यवहार करता यावेत यासाठी क्युआर कोडची अद्ययावत सेवा उपलब्ध करून दिली आहे. शाखा असलेल्या गावातून 9 ऑनसाईट व 1 ऑफसाईट एटीएमवर ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे. बँकेने आर्थिक मंदीच्या काळातही उल्लेखनीय कामगिरी करत रू. 500 कोटीपर्यंत एकूण व्यवसाय केलेला आहे. बँकेकडून जनसामान्यांचा सहभाग हा छोटे उद्योजक, साधे यंत्रमागधारक, अनेक कुटीर लघुउद्योजक, शेतकरी, दुध उत्पादक यांना कर्जाच्या माध्यमातून चांगले पतवान बनविले आहे. ग्रामीण भागातील सर्व शाखांच्या माध्यमातून पिक कर्ज, खावटी कर्ज, शेती सुधारणा सच्छिद्र पाइपलाईन कर्ज असे शेतीशी निगडीत कर्ज वाटप करून शेतकर्यांच्या प्रगतीतील सन्मती बँक असा विश्वास निर्माण झालेला आहे.
समाजाच्या वंचित घटकापर्यंत बँकेची सेवा मिळावी म्हणून महिला बचत गटामार्फत ग्रामीण भागातीत कमीत कमी व्याजदारात कर्ज पुरवठा करून रोजगार निर्मिती केलेली आहे. शिलाई मशीन, पशूपालन, गारमेंट व्यवसाय या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. थोड्याच दिवसात केंद्रीय निबंधक सहकारी संस्था नवी दिल्ली व आरबीआय यांचेकडून मंजुरी मिळाल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात शाखा विस्तार होणार आहे.
बँकचे सर्व संचालक, बीओएम चेअरमन डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, बीओएम सदस्य, बँकिंग तज्ञ संचालक यांचे वर्षभर व सीए सुनिल रेवणकर मार्गदर्शन लाभले. नेहमी वर्षभर परिश्रम करणार्या कर्मचार्यांमूळेच जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेली बँक म्हणून नांवलौकीक मिळवला आहे. यावेळी व्हा. चेअरमन एम. के. कांबळे, संचालक सर्वश्री शितल पाटील, प्रा. डॉ. प्रद्युम्नकुमार कडोले, डॉ. पुरूषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे, आण्णासो मुरचिटे, चंद्रकांत पाटील, प्रदिप मणेरे, संजय चौगुले, प्रा. आप्पासाहेब पाटील, हणमंत देशपांडे, महावीर येळरूटे, संदीप माळी, सौ. वसुंधरा कुडचे, डॉ. सौ. निमा जाधव, मनिष बालकिशन पोरवाल (सीए), सीईओ अशोक पाटील, असि. सीईओ समीर मैंदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार उपस्थित होते.
ब्रेकिंग



