संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जाहीर झालेल्या एकमात्र इचलकरंजीतील संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक शुक्रवारी कार्यालयात पार पडली. आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत १ हजार ६६० अर्जांना मंजुरी दिली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.
विधानसभा निवडणूक अचारसंहितेनंतर २८ मार्च 2025 रोजी समितीची बैठक झाली होती. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी बैठक झाली. या बैठकीमध्ये संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना अशा विविध गटातील १६६० अर्जांना मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर कार्यालयाचे कामकाज शुन्य पेंन्डन्सी करावे अशा सुचना आमदार राहुल आवाडे यांनी संबंधितांना दिल्या.
बैठकीस अप्पर तहसिलदार तथा समिती सचिव महेश खिलारी, हातकणंगले गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, सदस्य सुरेश कांबळे, नायब तहसिलदार चंद्रकांत काळगे, पुरवठा निरीक्षण अधिकारी दिनेश आडे, अनघा होणोळे यांच्यासह समिती माजी सदस्य कोंडीबा दवडते, संजय नागुरे, सुखदेव माळकरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.




