Homeक्रीडास्नेहा बसुदे हिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

स्नेहा बसुदे हिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी/प्रतिनिधी

येथील गंगामाई स्पोर्टस्च्या कु. स्नेहा बसुदे हीची जळगाव येथे होणाऱ्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून निवड झाली आहे.

कु. स्नेहा बसुदे हिने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून तिच्या या कामगिरीमुळेच तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक शेखर शहा, बी. ए. माने आणि के. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहेत. तर मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, मानद सचिव बाबासाहेब वडींगे, स्कुल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, विश्वस्त यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular