Homeराजकीयजयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक : लक्ष्यदिप शिवाजी कुंभार यांची जोरदार मोर्चेबांधणी

जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक : लक्ष्यदिप शिवाजी कुंभार यांची जोरदार मोर्चेबांधणी

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : आगामी जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची चुरस वाढू लागली असून, युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले लक्ष्यदीप शिवाजी कुंभार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

स्थानिक विकास, नागरिकांचे प्रश्न आणि तरुणांचा सहभाग या त्रिसूत्रीवर काम करत कुंभार यांनी प्रभागातील मतदारांशी सातत्याने संवाद साधला आहे. नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य देत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, त्यातून त्यांची लोकाभिमुख प्रतिमा अधिक दृढ झाली आहे.

प्रभागातील प्रत्येक भागात भेटीगाठींचे आयोजन करून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला जात आहे. या मोहिमेला नागरिक, महिला वर्ग आणि युवक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी बांधिलकी व्यक्त करत लक्ष्यदीप कुंभार यांनी नागरिकांसमोर “विश्वास आणि विकास” हा संदेश दिला आहे.

राजकीय वर्तुळात कुंभार यांच्या प्रचाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता, लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular