पेठ वडगाव (प्रतिनिधी) –

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक-९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात श्रीमती नंदा विठ्ठल हिरवे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघात त्यांची चर्चा वेगाने रंगू लागली आहे.
स्थानिक पातळीवर विविध समाजघटकांशी सातत्याने संपर्क ठेवत, जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या लोकहिताचे प्रश्न मांडत आहेत. समाजकारणातून वाढलेला जनसंपर्क आणि महिला वर्गात असलेली लोकप्रियता या बळावर त्या प्रभागात मजबूत उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.
श्रीमती हिरवे यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत विकासाभिमुख भूमिका मांडली असून, “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या सुविधा प्राधान्याने पूर्ण करणे हेच ध्येय” असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय वर्तुळात सध्या त्यांच्या या मोर्चे बांधणीची चर्चा रंगली असून, आगामी निवडणुकीत श्रीमती नंदा विठ्ठल हिरवे यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



