Homeराजकीयहुपरी नगरपरिषद प्रभाग क्र. ३ मध्ये अमय जाधव व रेवती पाटील यांची...

हुपरी नगरपरिषद प्रभाग क्र. ३ मध्ये अमय जाधव व रेवती पाटील यांची जोरदार प्रचारयंत्रणा सुरू

हुपरी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपाच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे. “सत्तेसाठी नाही… तर फक्त जनतेसाठी” या प्रभावी घोषणेसह अमय जाधव व रेवती पाटील या दोन्ही उमेदवारांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष जनसंपर्क मोहीम राबवली आहे.

प्रभागातील घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना मांडणे आणि विकासाचा ठोस रोडमॅप सादर करण्यावर भर दिला जात आहे. स्थानिक पातळीवर महिला-युवकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून प्रचारमोहीमेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अमय जाधव यासारख्या युवा नेतृत्वने एकात्मतेने पुढाकार घेतल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक पावलू सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी” हा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रचार अधिक जोमाने पुढे नेला जात आहे.

हुपरी नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रभाग क्र. ३ मध्ये राजकीय रंगत वाढत असून नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार मंगलराव माळगे यांचाही प्रचार जोरदार तग घरत आहे अश्या प्रकारच्या चर्चांना उधाण मतदारांमध्ये आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular