
हातकणंगले – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे लोकप्रिय नेतृत्व व प्रभागातील मजबूत ओळख असलेले राजू जयसिंगराव इंगवले यांनी प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली असून, परिसरात त्यांच्या प्रचाराची अक्षरशः मुसंडी पाहायला मिळत आहे.
प्रभागातील विविध गल्ली–बोळ, वाड्या–वस्त्यांमध्ये इंगवले यांचा प्रचार आता वेग घेत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदारांशी थेट संवाद साधत, स्थानिक समस्या जाणून घेत आणि विकासाच्या आश्वासनांची स्पष्ट मांडणी करत इंगवले जनतेचे मन जिंकताना दिसत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्येही विशेष उत्साह असून, घरदार संपर्क अभियान, पदयात्रा, कोपरा सभा अशा विविध कार्यक्रमांमधून इंगवले यांचे समर्थन वाढताना पहायला मिळत आहे. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता इंगवले यांच्या बाजूने वातावरण निर्मिती होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
हातकणंगले नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून राजू जयसिंगराव इंगवले हे दमदार स्पर्धक ठरत असून, त्यांच्या आक्रमक प्रचारामुळे निवडणुकीत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत प्रचार अधिक गतीमान होणार असून इंगवले यांच्या प्रचार मोहिमेची हीच जोरदार मुसंडी निकालावर महत्त्वाचा परिणाम करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.



