Homeराजकीयइचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी बाबासो राजमानेः सुभाष भस्मे उपाध्यक्ष

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी बाबासो राजमानेः सुभाष भस्मे उपाध्यक्ष

इचलकरंजी /प्रतिनिधी –

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार कक्षात पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष अतुल आंबी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.

यावेळी श्री. आंबी यांनी नुतन कार्यकारीणीची घोषणा केली. त्यामध्ये सचिवपदी रामचंद्र ठिकणे (सामना) व खजिनदारपदी हुसेन कलावंत-शेख (जागृत लोकनेता) यांची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीस अनिल दंडगे, पंडीत कोंडेकर, अतुल आंबी, शितल पाटील, बसवराज कोटगी, डॉ. पांडुरंग पिळणकर, महेश आंबेकर, इराप्णा सिंहासने, शिवानंद रावळ, विजय चव्हाण, भाऊसाहेब फास्के, छोटूसिंग रजपूत, संभाजी गुरव, महावीर चिंचणे उपस्थित होते. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

इचलकरंजी प्रेस क्लब अध्यक्षपदी अरुण काशिद तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे

इचलकरंजी /प्रतिनिधी –

प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी अरुण काशीद (लोकमत) तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे (सकाळ) यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.

प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जुनी नगरपालिका येथील पत्रकार कक्षात संपन्न झाली. याप्रसंगी या निवडी करण्यात आल्या. यामध्ये संघटनेच्या सेक्रेटरीपदी संदीप जगताप (सकाळ) त्याचबरोबर खजिनदारपदी सुनील मनोळे (महासत्ता) यांची निवड करण्यात आली. यावेळी ६ जानेवारी २०२६ पत्रकार दिन साजरा करणे त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करणे या विषयावर चर्चा करण्यात आली. नूतन पदाधिकारी यांनी भविष्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, पत्रकारांसाठी विविध योजना आणि वर्षभर वेगवेगळे उपक्रम प्रेस क्लब च्या माध्यमातून राबवणार असल्याचेही सांगितले.

बैठकीस दयानंद लिपारे (लोकसत्ता), संजय खुळ (तरुण भारत), शरद सुखटणकर (पुढारी), अजय काकडे (महासत्ता), ऋषिकेश राऊत (सकाळ) उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular