Homeराजकीयइचलकरंजी महापौरपदासाठी शर्यत रंगात, जोरदार चर्चा

इचलकरंजी महापौरपदासाठी शर्यत रंगात, जोरदार चर्चा

इचलकरंजी : शहरातील राजकारणात सध्या महापौरपदाची निवडणूक केंद्रस्थानी आली असून महापौरपदासाठी संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर लवकरच करण्यात येणार आहे या यादीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या शर्यतीत तानाजी पोवार, नितेश पोवार, ओंकार सुर्वे, राजू पुजारी, सौ. सपना भिसे, प्रदीप धुत्रे तसेच सौ. किरण खवरे, उदय धातुंडे , अभिषेक वाळवेकर, सुशांत कलागते, सतीश मुळीक आणि सौ. ध्रुवती दळवाई यांची नावे पुढे आली आहेत.

महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत सध्या तर्क-वितर्क सुरू असून विविध पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी संपर्क वाढवणे, समर्थक गोळा करणे आणि पक्षनेतृत्वाची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

“कोण होणार इचलकरंजीचा महापौर?” हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरला असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular