Homeराजकीयदोस्ती सर्कलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध – अक्षय चव्हाण

दोस्ती सर्कलच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध – अक्षय चव्हाण

शहापुर (इचलकरंजी) (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत आणि युवकांना एकत्र आणत समाजहिताचे कार्य करण्यासाठी “दोस्ती सर्कल” या संघटनेच्या माध्यमातून अक्षय चव्हाण यांनी एक वेगळी दिशा दिली आहे. जनतेच्या दैनंदिन समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे, तरुणांना समाजकार्यात सहभागी करून घेणे आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अक्षय चव्हाण म्हणाले, “फक्त टीका किंवा मागणी करून न थांबता, उपाय शोधण्यासाठी प्रत्यक्ष पातळीवर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर ठोस कृती होईपर्यंत पाठपुरावा करणे, हेच आमचे ध्येय आहे.”

‘दोस्ती सर्कल’च्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक उपक्रम — स्वच्छता मोहिमा, युवक मार्गदर्शन शिबिरे, रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत उपक्रम आणि पर्यावरण जनजागृती मोहिमा — राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे अनेक तरुणांना समाजकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली आहे.

चव्हाण पुढे सांगतात, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्वांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकांच्या विश्वासावर आम्ही कार्य करत राहू. तसेच संधी मिळाल्यास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकाकेचे दार ठोकावु”

जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, दोस्ती सर्कल आगामी काळात आणखी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

RELATED ARTICLES

Most Popular