Homeराजकीयप्रभाग क्रमांक-०९ सुहास कांबळे यांची जोरदार मोर्चे बांधणी

प्रभाग क्रमांक-०९ सुहास कांबळे यांची जोरदार मोर्चे बांधणी

🗞️ इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक अपडेट

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मधून सुहास श्रीकांत कांबळे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील विविध प्रश्न जाणून घेतले असून, विकासाच्या मुद्द्यांवर भर देत मतदारांशी संवाद वाढवला आहे.

सुहास कांबळे यांनी आत्तापर्यंत सामाजिक , राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असुन व्यक्तीगत प्रभाव जनतेच्या मनावर पाडण्यात यश मिळवले आहे

प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व युवकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सुहास कांबळे यांनी व्यापक जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

आगामी काळात अधिक व्यापक प्रचार, बैठका व संपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आपली भूमिका अधिक भक्कम करण्याचा निर्धार जनतेने यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular