इचलकरंजी प्रभाग क्रमांक-१२ मध्ये स्थानिक पातळीवर वाढलेल्या विकासाच्या अपेक्षा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणारा चेहरा म्हणून अक्षय बरगे यांचे नाव जनतेत लोकप्रिय ठरत आहे. प्रभागातील नागरिक, व्यापारी, महिला वर्ग तसेच युवकवर्गामध्ये “जनतेची पसंदी – अक्षय बरगे” असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे.

अक्षय बरगे यांनी मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्य, युवकांच्या रोजगार उपक्रम, तसेच स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्यांच्या निराकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
जनतेच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक-१२ मध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार अक्षय बरगे यांनी व्यक्त केला आहे