Homeराजकीयप्रभाग क्र. १२ मधून सौ. दिपाली अक्षय बरगे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी

प्रभाग क्र. १२ मधून सौ. दिपाली अक्षय बरगे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी

आपला प्रभाग आपला नगरसेवक अशी जनतेतून मागणी येत आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून सौ. दिपाली अक्षय बरगे या आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. दिपाली बरगे यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व युवक सक्षमीकरण, तसेच आरोग्य व शिक्षण या विषयांवर ठोस उपाययोजना राबविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. “प्रभागातील प्रत्येक घटकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि विकासकामे पारदर्शक पद्धतीने राबवणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular