
इचलकरंजी- प्रभाग क्र. 09 येथे आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी पार पडलेल्या “१११११ दुरडी अर्पण भक्तीचा दिव्य क्षण” या भव्य धार्मिक सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री शंभूचरणी दुरडी अर्पण या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभागी होत भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक शक्तीचा सुंदर संगम घडवून आणला. विशाल उत्साह, ढोल-ताश्यांचा निनाद, वेशभूषेतील पारंपरिकता आणि भक्तिमय जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
वेताळ मंदिर ते शंभूतीर्थ या मार्गावर महिलांनी शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी काढत श्री शंभू महाराजांना दुरडी अर्पण केली. वातावरणात भक्तीचा ओलावा आणि ऐतिहासिक परंपरेचा अभिमान जाणवत होता.



कार्यक्रमास माजी आमदार प्रकाश आवाडे व परिभाग क्रंमाक -९ मधील सर्व प्रमुख , कार्यक व युवक तसेच प्रचंड महिलाचा उत्आसाह होता
दुरडी व तोरण अर्पण सोहळाच्या नियोजनमुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले असून आयोजकांनी उपस्थित सर्व भक्तांचे मनःपूर्वक आभार मानले.



