Homeक्रीडामहानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत गंगामाई गर्ल्स हायस्कुलने विजेतेपद मिळविले

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत गंगामाई गर्ल्स हायस्कुलने विजेतेपद मिळविले

इचलकरंजी /प्रतिनिधी-

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुलने विजेतेपद मिळविले. विजयी संघांची रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर संपन्न या स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात १२, १७ वर्षाखालील गटात १८ तर १९ वर्षाखालील गटात ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा शुभारंभ महानगरपालिका क्रीडा अधिकारी सुर्यकांत शेटे, शेखर शहा, बी. एस. माने, रफिक मांगुरे, बाळू चव्हाण, वसिम बागवान, ओंकार खानाज, सचिन खोंद्रे, संजय कांबळे, विजय गुख व संजय परी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

सर्वच सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. प्रत्येक खेळाडूने आपले कसब पणाला लावत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. १४ वर्षाखालील गटात गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (प्रथम), ताराबाई गर्ल्स हायस्कूल (द्वितीय) व तात्यासाहेब मुसळे हायस्कुल (तृतीय), १७वर्षाखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुल (प्रथम), सरस्वती हायस्कुल (द्वितीय) व ताराबाई गर्ल्स हायस्कुल (तृतीय) तर १९ वर्षांखालील गटात गंगामाई गर्ल्स हायस्कुल (प्रथम), डीकेटीई मराठी मिडीयम ज्युनिअर कॉलेज (द्वितीय) आणि ताराबाई गर्ल्स हायस्कुल (तृतीय) यांनी यश मिळविले.

RELATED ARTICLES

Most Popular