
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे असताना शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी दोन दिवस आड
पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र अलीकडे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र आहे. जलवाहिनीला सतत लागणारी गळती, तसेच तांत्रिक कारणांमुळे सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
लालनगर परिसरात आठवडाभरापासून पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांनी घागरी घेऊन
इचलकरंजी लालनगरमधील महिलांनी निरामय रिंगरोडवर मंगळवारी घागरी घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.
इच्छुक उमेदवारही समर्थकांसह आंदोलनात सहभागी होते .



